Home विदर्भ १४ ऑक्टोला होणार ” बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

१४ ऑक्टोला होणार ” बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९ फूट उंच पुतळ्याचे अनावरण

807

 १३ एकर जागेवर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर स्मारक तयार

सिंदेवाही

.           ” द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची जगामध्ये ओळख आहे. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९ फूट उंचीचा पुतळा ज्याला ” स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी” या नावाने संबोधल्या जाणार आहे. अशा या पुतळ्याचे अनावरण १४ ऑक्टोंबर २०२३ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील मेरीलँड शहरात होणार आहे.

.           जगविख्यात ज्ञान पंडित म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगभर ओळखल्या जाते. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १९ फूट उंचीचा पुतळा अमेरिकेमध्ये तयार केला असून प्रसिध्द कलाकार आणि मूर्तिकार ज्यांनी गुजरात मधील प्रसिद्ध असलेला सरदार पटेल यांचा पुतळा तयार केला आहे, असे प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा बनविला आहे.अमेरिकेतील वॉशिंग्टन पासून ३५ किमी अंतरावर असलेल्या मेरीलँड शहरातील १३ एकर जागेवर “आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर” ( एआयएस) नावाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात आले असून या ठिकाणी ” स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी” या नावाने संबोधल्या जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १९ फूट उंचीचा पुतळा बसविल्या गेला असून भारताबाहेरील हा सर्वात मोठा पुतळा असल्याचे एआयएस कडून सांगण्यात येत आहे. १४ ऑक्टोंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार असून यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे अमेरिकेसह जगातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

.           अमेरिकेतील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे शैक्षणिक कार्य जगामध्ये प्रसार करण्याचे काम करणार असून हे स्मारक समानता आणि मानवाधिकार यांचं प्रतीक ठरणार आहे.१४ ऑक्टोंबर रोजी या अनावरण सोहळ्यासाठी विविध देशातील आंबेडकरी अनुयायी येतील असा विश्वास आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!