Home विदर्भ चौकशी समिती नेमलीच नाही, तर चौकशी झालीच कशी ?

चौकशी समिती नेमलीच नाही, तर चौकशी झालीच कशी ?

800

“उमेद” अभियान वासेरा अंतर्गत ग्रामसंघाची प्रोसेडिंग बुक फाडल्याचे प्रकरण.

ज्यांचे विरोधात तक्रार आहे. तेच चौकशी अधिकारी कसे?

सिंदेवाही 

.           उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वासेरा येथील सखी ग्रामसंघाचे प्रोसेडिंग बुक फाडून त्यामध्ये नवीन ठराव लिहला असल्याची तक्रार जिल्हा अभियान व्यवस्थापक यांचे कडे झाली असून त्याबाबतची चौकशी समिती गठीत करून नेमणूक झालीच नाही, तर चौकशी झालीच कशी ? असा प्रश्न तक्रारदार मीना दीपक बोरकर यांनी संबंधितांना विचारला असून प्रोसेडिंग फाडणारेच चौकशी करू शकतात का ? असा प्रश्न अनेक महिलांनी विचारला आहे.

.           उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वासेरा येथे आय सिआरपि चे पदे मागील दोन वर्षापासून रिक्त असल्यामुळे ग्रामसंघाच्या मीटिंग मध्ये चर्चा करून १०/८/२०२२ रोजी दोन्ही ग्राम संघाची संयुक्त बैठक ग्राम पंचायत कार्यालय वासेरा येथे घेण्यात आली. या मध्ये विविध विषयावर चर्चा करून आय सीआरपी (कॅडर) म्हणून मीना दीपक बोरकर आणि मनीषा कवींद्र आनंदे यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळी लिपिका मीना बोरकर यांनी सखी आणि मैत्री ग्रामसंघाचे दोन्ही प्रोसेडिंग बुकावर याबाबतचा विस्तृत ठराव लिहला. आणि त्याखाली उपस्थित सर्व ३० ते ४० महिलांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या .निवड झाल्यानंतर तालुका अभियानातील कर्मचारी यांनी दोघींनाही रुजू करून घेतले नाही. मात्र अचानक एप्रिल २०२३ मध्ये मनीषा कवींद्र आनंदे यांना आय सीआरपी म्हणून रुजू करून घेतले. तेव्हा मीना बोरकर यांनी तालुका अभियान व्यवस्थापक यांना याबाबत बोलले असता, तुमच्या सारखी लिपिका आम्हाला मिळत नाही.

.           अगोदर तुम्ही लिपिका शोधा नंतर तुम्हाला आय सीआरपी म्हणून घेतो असे बोलले, मात्र त्यानंतर मीना बोरकर यांना कधीच रुजू करून घेतले नाही. अचानक सखी ग्राम संघाच्या अध्यक्षा यांनी आय सीआरपि चे पद भरण्याबाबत अर्ज मागितले. तेव्हा प्रभाग समन्वयक यांना मी याबाबत बोलले असता, ग्राम संघाच्या अध्यक्षा तेव्हा मीटिंग साठी उपस्थित नव्हत्या म्हणून तुमची निवड रद्द केली आहे. असे त्यांनी सांगितले.

.           विशेष म्हणजे कॅडर ची निवड ही ग्राम संघातून होत असते, ग्राम संघाच्या अध्यक्षांना कोणताही अधिकारी नसताना त्यांना विचारात घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र आर्थिक देवाण घेवाण करून आपल्याच मताने प्रभाग समन्वयक यांनी पेपर घेण्यात येतील असे सांगितले. आणि बोगस पेपर घेतले. याबाबतची तक्रार तालुका अभियान व्यवस्थापक सिंदेवाही यांना देण्यात आली. त्यानुसार अभियान व्यवस्थापक उद्धव मडावी, दिनेश जांभूळकर, हे पं.स.विस्तार अधिकारी अमित महाजनवार, राजेश शेंडे यांना घेऊन ग्राम संघाच्या कार्यालयात पोहचले. यावेळी तक्रारदार यांना कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नाही. आणि ऐन वेळेवर तक्रारदारांना उपस्थित राहण्यास सांगितले. तेव्हा मी माझी निवड झाली असून सखी ग्रामसंघाच्या प्रोसेडिंग बुकमध्ये ठराव लिहला आहे. असे सांगितले त्यावेळी प्रोसेडिंग बुक तपासले असता त्या प्रोसेडिंग बुकमध्ये लिपिका मीना बोरकर यांनी लिहलेले ठराव गायब असल्याचे दिसले. तेव्हाच मी उपस्थित विस्तार अधिकारी यांना प्रोसेडिंग बुक फाडले असल्याचे सांगितले. आणि दुसऱ्याच दिवशी याबाबतची तक्रार जिल्हा अभियान व्यवस्थापक कार्यालय येथे दिली.

.           मात्र अजूनही कोणतीही चौकशी समितीची नेमणूक झाली नसताना चौकशी झाली असून चौकशीत कोणतेच तथ्य आढळले नसल्याची खोटी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक विवेक नागरे प्रसिद्धी माध्यमांना का दिली ? असा प्रश्न विचारला असून चार व्यक्ती मिळून प्रोसेडिंग बुकातील ठराव फाडले असल्याने सखी ग्रामसंघाच्या अध्यक्षा नीलिमा कोवले, तालुका अभियान व्यवस्थापक विवेक नागरे, तालुका व्यवस्थापक उध्दव मडावी, आणि दिनेश जांभूळकर यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार मीना दीपक बोरकर यांनी केली आहे.

प्रोसेडिंग बुक फाडला असल्याची तक्रार बोरकर यांनी जिल्हा अभियान कार्यालय चंद्रपूर येथे दिलेली आहे. आणि लवकरच याबाबत जिल्हा स्तरावरून एक चौकशी समिती गठीत करून सदर प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येणार आहे. मी अजून कोणतीही चौकशी समितीची नेमणूक केली नाही. त्यामुळे चौकशी झाली म्हणून खोट्या बातम्या प्रसिद्ध करू नये.                                                                                                                                                                                                                    मनोहरजी वाकडे,                                                                                                                                                                         जिल्हा अभियान व्यवस्थापक,                                                                                                                                         उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा कार्यालय चंद्रपूर

 

दोन्ही ग्रामसंघाची संयुक्त ग्रामसभा ग्राम पंचायत कार्यालय वासेरा येथे माझ्या समक्ष पार पडली असून मी त्या सभेचा साक्षीदार आहे. गावातील दोन व्यक्तींची आय सिआरपी म्हणून निवड झाली होती. मी त्याबद्द्ल दोघींचे सुद्धा अभिनंदन केले आहे. त्यामुळे मीना बोरकर यांची निवड झाली नाही. असे म्हणणे चुकीचे आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                महेश बोरकर                                                                                                                                                                              सरपंच. ग्राम पंचायत वासेरा.

error: Content is protected !!