सिंदेवाही
. ग्राम पंचायत कार्यालय वासेरा यांचे वतीने रविवारी सकाळी ९ वाजता एक तास अभियान अंतर्गत ” स्वच्छ्ता ही सेवा” हा उपक्रम राबविताना गावातील सर्व पदाधिकारी यांनी गाव स्वच्छ करून गावाला स्वच्छतेचा संदेश दिला.
. शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यात १ तारीख, १ तास, एक साथ श्रमदान, या अभियाना अंतर्गत ” स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवून गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
. आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्व काय ? हे पटवून देण्यात आले . यावेळी ग्राम पंचायत चे सरपंच महेश बोरकर, ग्राम विकास अधिकारी गुरनुले, सदस्य निखिल कोवे, दिलीप मेश्राम , महेंद्र सूर्यवंशी, नागेश बंडीवार, अस्मिता रामटेके, गीता मेश्राम, प्रीती कारमेंगे, तंटा मुक्त समिती सदस्य राजू नंदनवार, अंगणवाडी सेविका वनिता कुंदोजवार, प्रतिमा सूर्यवंशी, मंगला डोंगरवार, पौर्णिमा सूर्यवंशी, सेविका परिमल रामटेके, तसेच ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.


