- चोरटा कार्यालयातील की बाहेरील
- दुसरी घटना असल्याची माहिती
- पोलीस ठाण्यात तक्रार नाही
वरोरा
पंचायत समिती वरोरा येथे एका अंगणवाडी सेविकेचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . या पुरस्कार सोहळ्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित असताना बालविकास कार्यालयात एका महिला कर्मचार्यां्ने आपली पर्स तिथेच ठेवली असताना एका अज्ञात चोरट्याने पर्स मधून पैसे चोरल्याची घटना उघडकीस आली . मात्र रक्कम कमी असल्याने याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नसून हा प्रकार याच कार्यालयात दुसर्यां दा घडल्याने चोरटा हा कार्यालयातला आहे की बाहेरचा हे सध्यातरी कळले नाही मात्र या चोरट्याचा शोध येथील अधिकारी व कर्मचारी करीत असल्याचे समजते .
प्राप्त माहितींनुसार पंचायत समिती वरोरा च्या हॉल मध्ये आयएसओ प्राप्त अंगणवाडी सेविका यांचा पुरस्कार सोहळा कार्यक्रम आयोजीत केला होता . या सोहळ्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी हे पंचायत समीती हॉलमध्ये गेले होते . दरम्यान बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये एका महिला कर्मचार्यालने आपल्या ठेबलवर पर्स ठेऊन कार्यक्रमाला उपस्थित झाल्या . कार्यालयात कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कार्यालयात प्रवेश करून महिला कर्मचार्या च्या टेबल वर असलेल्या पर्समधुन पैसे चोरी केले . पुरस्कार सोहळा आटोपल्या नंतर सदर महिला कर्मचारी कार्यालयात आली असता पर्स ची चैन काढून दिसल्याने शंका आली . पर्स मध्ये बघितल्या नंतर पर्स मध्ये असलेले पैसे गायब दिसल्याने आपल्या पर्स मधील पैसे कोणीतरी चोरल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यां ना दिली . चोरी गेलेले पैसे खूप कमी असल्याने व कार्यालयाची बदनामी होणार या भीतीने या चोरत्या विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे समजते . पर्स मधील पैसे चोरणारा चोरटा कार्यालयातील की बाहेरील अशी चर्चा सुद्धा कर्मचार्यालत होत होती . या कार्यालयातून पैसे चोरी गेल्याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली होती. यापुर्वी सुध्दा अशीच चोरी झाल्याची माहिती या घटनेनंतर चर्चेत आली . या चोरटयावर आळा घातला नाही तर यापेक्षाही मोठी चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वरीत या चोरटयाचा शोध घेवुन समज देण्यात यावी अशी मागणी कर्मचारी वर्गाकडुन होत आहे . अन्यथा तक्रार दाखल करु. हा चोरटा बाहेरचा कि कार्यालयातला हे कळने गरजेचे आहे.
चोरटा मिळाल्यास कायदेशिर कार्यवाही करु आयएसओ अंगणवाडी सेविका यांचा पुरस्कार सोहळयाचा कार्यक्रम पंचायत समिती हॉलमध्ये आयोजीत केला होता त्या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी गेलो होतो. तिथुन परत आल्यानंतर पर्समधुन पैसे चोरीस गेल्याची बोंब कर्मचारी करु लागले. यापुर्वीसुध्दा असा प्रकार घडला असल्याचे कर्मचारी यांनी सांगीतले सदर चोरटा मिळाल्यास कायदेशिर कार्यवाही करु. अलंकार मरसकोल्हे, प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती वरोरा