Home सामाजिक एकाच कुटुंबातील 3 दिव्यांग व्यक्तींना 3 चाकी सायकलची अनोखी भेट

एकाच कुटुंबातील 3 दिव्यांग व्यक्तींना 3 चाकी सायकलची अनोखी भेट

809

शिवसेना समाजातील दुर्बल गरजू व्यक्तीच्या पाठीशी नेहमी तत्परतेने उभीजिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे

वरोरा 

.         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्थानिक स्नेहमिलन कार्यालय सरदार पटेल वार्ड येथील आयोजित कार्यक्रमात जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या संकल्पनेतून एका दिव्यांग व्यक्तीस शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांच्या हस्ते तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले.

.         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारणा प्रेरित होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे नेहमीच समाजोपयोगी कार्य करत असतात. यामध्ये विद्यार्थांना शैक्षणिक मदत, रुग्णांना आरोग्य विषयी मदत, दिव्यांग व्यक्तींना मदत तसेच समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदत पोहविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. तालुक्यातील लोधीखेडा येथील एकाच कुटुंबात 3 व्यक्ती दीव्यांग असल्याने व त्यांना 3 चाकी सायकली गरज असल्याची माहिती येथील शिवसैनिक मलकन उमरे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांना देताच स्थानिक स्नेहमिलन कार्यालय सरदार पटेल वार्ड येथे पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा कामगार नेते व माजी नगरसेवक मनोज जामसुतकर व मुंबईचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील हस्ते दुर्गेश विलास मोहारे, अथर्व विलास मोहारे, खुशाल विलास मोहारे या एकाच कुटुंबातील 3 गरजू दिव्यांग व्यक्तींना शिवसेना परिवारातर्फे मदत म्हणून तीन चाकी सायकल भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी वरोरा – भद्रावती विधानसभेतील असंख्य शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, युवतीसेना कार्यकर्ते व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!