टेमुर्डा येथे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन

29
  • सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या
  • शेतकरी नेते किशोर डुकरे यांचे नेतृत्व

 

चंद्रपुर

.        मोझ्याक आणि बुरशी रोगाने शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक उध्वस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत व कोणतेही निकष न करता सरसकट विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी चंद्रपूर नागपूर महामार्गांवरील टेमुर्डा येथे शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

.        सोयाबीन हे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाते. वरोरा तालुक्यात मोठया प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली. यावर्षी उशीरा लागवड केली तरी सोयाबीन पीक चांगले होते. यावर्षी चांगले उत्पन्न होणार ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अचानक मोझ्याक व बुरशी रोगाने अख्खे सोयाबीन चे प्लाट च करपून गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याने मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती न लावता सरसकट हेक्टरी ५० हजार रुप,ये नुकसान भरपाई देण्यात यावी व पीक विम्यामध्ये कोणतेही निकष न ठेवता पीक विमा मंजूर करण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर नागपूर महामार्गांवरील टेमुर्डा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

.        या आंदोलनाला तहसील कार्यालय वरोरा चे नायब तहसीलदार लोखंडे यांनी आंदोलन स्थळी भेट देत शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले.

.        यावेळी पुरुषोत्तम पावडे, संदीप वासेकर, श्रीकृष्ण देवतळे, आकाश धवने, राजू डुकरे, लक्ष्मण आसुटकर, मोतीराम जांभुळे, आशिष जांभूळे, महेंद्र गारघटे, उमेश टोंगे, धर्मदास डुकरे, अशोक मगरे, प्रभाकर मगरे, अंकुश चौधरी, रघु खापणे तसेच परिसरातील शेतकरी हजर होते