गडबोरी येथील वळण मार्ग झाला धोकादायक
सा. बां. विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पुन्हा झाला अपघात
सिंदेवाही
. सार्वजानिक बांधकाम विभाग सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या वासेरा – सिंदेवाही या मार्गावरील गडबोरी गावालगत असलेल्या वळणावर आज पुन्हा एक ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग किती जागरूक आहे. हे या घटनेवरून दिसून येते.
. गडबोरी या गावालगत असलेल्या वळणावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एकदम रोड लगत नहर असून डाव्या बाजूच्या शेतकऱ्यांनी डांबरीकरण ला लागून कुंपण केले असल्याने सदर वळण खूपच धोकादायक झाले आहे. व आजपर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून सुद्धा याकडे डोळेझाक केले आहे. रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे वाढले असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. तसेच रस्त्यालगत नहर असल्याने त्याठिकाणी खूपच धोका निर्माण झाला आहे. आज दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान गडबोरी येथील सोनल जवळे यांचे मालकीचे ट्रॅक्टर घेऊन त्यांचा चालक शेताकडून येत होते. ट्रॅक्टर वळणावर येताच समोरील वाहन दिसले नाही. आणि त्यामुळे ट्रॅक्टर रोडच्या बाजूला घेण्याच्या नादात सरळ शेतामध्ये ट्रॅक्टर घुसून पलटी झाला. व चालक ट्रॅक्टर खाली दबल्या गेला. गावाजवळ ची घटना असल्यामुळे लगेच गावातील नागरिक धाऊन चालकाला गाडी बाहेर काढले. आणि त्याला तात्काळ दवाखान्यात भरती केले आहे. सध्या चालकाची तब्येत स्थिर आहे. वारंवार या वळणावर अशा घटना घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही यांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच वेळोवेळी वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र संबंधित विभाग याकडे डोळेझाकपणा करीत असून भविष्यात या वळणावर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही यांनी सदर वळण मार्गावर असलेले नहर ताबडतोब स्थानांतर करावे. तसेच रस्त्यालगत असलेले कुंपण रस्ता रुंद करावा. अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

