Home विदर्भ ओबीसी आंदोलनकर्ते टोंगेना रुग्णालयात हलविले

ओबीसी आंदोलनकर्ते टोंगेना रुग्णालयात हलविले

814
  • ३० सप्टेंबरला ‘चंद्रपूर जिल्हा बंद’चे आवाहन

चंद्रपूर

.          जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने शुक्रवारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले तर त्यांच्या जागी विजय बलकी यांनी १२ व्या दिवसापासून उपोषण सुरू केले. दरम्यान, राज्य सरकारने अजुनही आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी संघटनांनी आज मातोश्री सभागृहात बैठक घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि ३० सप्टेंबरला ‘चंद्रपूर जिल्हा बंद’चे आवाहन केले.

error: Content is protected !!