बांधकाम विभाग झोपेत
नेरी
चिमूर पासून शंकरपूर मार्गे नागपूर ,ब्रह्मपुरी ,भंडारा जाणारा जुना राज्य महामार्ग आहे . या रस्त्याने मोठ्या संख्येने अवजड वाहनाची वर्दळ असून शंकरपूर ते कानपा या मार्गाची चार दिवसात झालेल्या अति पावसामुळे पूर्णपणे दुर्दशा झाली आहे या ठिकाणी अपघात हा निश्चित ठरलेलाच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळ लक्ष देतील का नाही अशी चिंता प्रवाशांमध्ये तसेच परिसरातील नागरिकात निर्माण झाली आहे.
याच संदर्भात मागील पंधरा दिवसाआधी शंकरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच तसेच पर्यावरणवादी मंडळांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याबाबत निवेदन देऊन रस्ता त्वरित बनवण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार दोनच दिवसात बांधकाम विभागाने दोन दोन फुटाच्या पडलेल्या खड्ड्यामध्ये मुरूम आणून भरला परंतु त्यानंतर आलेल्या मुसळधार पावसाने मुरूम बाजूला निघून आणखी मोठ मोठे खड्डे निर्माण झाले त्यामुळे रस्त्यावर तीन फूट रुंद व पाच फूट लांब अशा आकाराचे बरेच खड्डे निर्माण झाले त्यामुळे रस्त्यावर खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजेनाचे झाले त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि हे खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत.
चिमूर ते कानपा रोडवरील शंकरपूर हे गाव राजकीय दृष्ट्या व व्यापारी दृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे हा राज्य मार्ग शंकरपूर वस्तीतून जात असून मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठी वस्ती आहे परंतु ऐन बस स्टॉप चौकामध्येच मोठे मोठे खड्डे पडल्याने वाहतूक करणे किंवा पायदळ फिरणेही अशक्य होत आहे. तसेच ही परिस्थिती शंकरपूर ते कानपा इथपर्यंत आहे शेवटी या मार्गाची एवढी दुर्दशा होऊन सुद्धा या बांधकाम विभाग झोपेमध्ये आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या या रस्त्यावर अवजड वाहन तसेच एसटी बस किंवा मोठे वाहन पॉलिटी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या रस्त्याची त्वरित पाहणी करून हा रस्ता कायमस्वरूपी लवकर बनविण्यात यावा अशी मागणी प्रवासी तसेच शंकरपूर व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

