गडचांदूर
धावत्या बसमधून उडी घेतल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 30 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे 1.30 वाजता घडली. राकेश इंद्रजीत पटेल ( 25) रा. रीवा मध्यप्रदेश असे मृत तरूणाचे नाव आहे .
मृतक तरुण हा राजुरा-गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर चालक म्हणून कार्यरत होता.
एक वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. दरम्यान आदिलाबाद ते चंद्रपूर जात असलेल्या तेलंगणा राज्यातील बसमध्ये बसून पत्नी आणि दोन सोयरे, यांच्या सोबत गडचांदूर वरून चंद्रपूरच्या दिशेने जात होता. गडचांदूर बस स्टँड पासून काही अंतरावर अचानक त्याने धावत्या बसमधून उडी घेतली असता त्याचा जागीच मृत्यू झाला. तो पत्नी सोबत खिर्डी येथे किरायाने राहत होता. त्याने अचानकपणे उडी का घेतली? याचे कारण कळले नसून नागरिकांनी त्याला जखमी अवस्थेत त्याच बस मधून शासकीय रुग्णालयात पाठवले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, सहकाऱ्यासह रूग्णालयात पोहोचले. पंचनामा करून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या गावी पाठवण्याची व्यवस्था तसेच काही पैशाची मदत खिर्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिपक खेकारे, यांनी ठेकेदाराच्या संबंधित जबाबदार व्यक्ती सोबत व्यवस्था करून दिली


