Home Breaking News अपघातात थोडक्यात बचावली चिमुकली मात्र पायाला दुखापत   

अपघातात थोडक्यात बचावली चिमुकली मात्र पायाला दुखापत

824
  •  सुसाट धावणार्‍या वाहनावर लगाम लावा 
  • नागरिकांची मागणी 

नागभीडः     

नागभीड तालुक्यातील म्हसली येथे पट सुरू आहे . म्हसली येथे कोटगाव येथून जावे लागते. पट पाहण्यासाठी जाणारे वाहनधारक धूम ठोकत वाहने चालवीत असतात. याच मार्गावर असलेल्या अंगणवाडी मधून खिचडी खाऊन एक चिमुकली बाहेर निघाली असता ती एका दुचाकीला धडकली या अपघातात ती थोडक्यात बचावली मात्र तिच्या पायाला दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी घडली . या घटनेनंतर तरी या मार्गावर धावणार्‍या वाहनांना लगाम लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे .

नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील अंगणवाडी येथील दिव्यांती शरद कुंभरे या चिमुकलीचा अपघात झाला माञ अपघातात पायाला जखम झाली. थोडक्यात चिमुकली बचावली. म्हसली येथे पट सुरू आहे . पट पहाण्यासाठी कोटगांव मार्गाने चारचाकी, दुचाकी जात असतात. सर्व वाहने गावातुनच जात असतात. गावातुनच मार्ग असल्याने वाहने दुसऱ्या मार्गाने जात नाही. याच मार्गाला लागुन जि.प.शाळा व दोन अंगणवाडी आहेत. यामध्ये लहान लहान मुले शिकायला जात येत असतात. तसेच आंगणवाडीतील मुले सुद्धा केव्हाही बाहेर येत असतात. आंगनवाडीमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे बगायला मिळते. अधिकारी वर्गाचा दबाव नसल्याने नियोजन शुन्य काम आहे . अपघातग्रस्त मुलगी ही खिचडी खाऊन बाहेर निघाली. पट सुरु असल्याने वाहनांची वर्दळ सुरु होती . अशातच ही मुलगी एका दुचाकीला धडकली . आणि ती रोडवर पडल्याने पायाला दुखापत झाली. ती चिमुकली वेदनानी रडत होती . आंगणवाडी येथील सेविंकाचे मुलांकडे दुर्लक्ष असल्याचे . अनेकदा मुलं बाहेर असतात तर सेविका आत मध्ये असतात. याकडे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी नागरीकांची मागणी आहे.

error: Content is protected !!