तांदूळ तस्करची चौकशी करण्याकरिता एसआयटी स्थापन करा

43
  • शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे पालकमंत्र्यांना निवेदन 

चंद्रपूर,

. वरोरा तालुक्यातील माढेळी येथील राहुल वामनराव देवतळे हा शासकीय योजनेतील धान्याची तस्करी करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. देवतळे हा या तस्करीतील छोटा मासा आहे. शासकीय धान्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट या भागात सक्रिय आहे. त्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन मत्ते यांनी केली.

. देवतळे यांनी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गोदाम भाड्याने घेतले. तिथे तो स्वस्त धान्य दुकान आणि शालेय आहार योजनेतील तांदूळ साठवून ठेवत होता. त्याची तस्करी जिल्ह्यातील आणि लगतच्या राज्यातील राईस मिल यांना करीत होता. मागील अनेक दिवसांपासून हा अवैध व्यवसाय रोजरोसपण सुरू होता. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही, याचाही तपास केला पाहिजे, अशी मागणी मते यांनी केली.

 

उल्लेखनीय असे की माढेळी परिसरात तांदूळ उत्पादक शेतकरी नाही. देवतळे यांनी तस्करी केलेल्या तांदळाच्या प्रजातीचे उत्पादनसुद्धा माढेळी परिसर आणि जिल्ह्यातसुद्धा होत नाही. मात्र, शासकीय योजनेतील तांदूळ खरेदी दाखवून त्याचा बाजार समितीने .शेष घेतलेला आहे. यामुळे बाजार समितीची भूमिकासुद्धा संशयास्पद आहे. शासकीय योजनेतील तांदूळ तस्करीत पुरवठा निरीक्षक, स्वस्त धान्य दुकानदार, शालेय पोषण आहार योजनेतील काही शाळांचे मुख्याध्यापक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीतल काही जणांचा समावेश आहे, असा संशय नितीन मते यांनी व्यक्त केला. यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तांदूळ तस्करीची पाळेमुळे शोधा, अशा मागणीचे निवदेन मत्ते यांनी पालकमंत्री आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले. गोंदिया येथील तांदूळ तस्कर प्रकरणात चौकशी सुरू झाली आहे. या तस्करीचे तार चंद्रपुरात जुळले असल्याची माहिती आहे.