Home Breaking News भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 

भद्रावती पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

824
  • दहा जणांवर गुन्हे दाखल 
  •   ४ लाखाचा मुद्देमाल जप्त 

भद्रावती

. शहरालगत असलेल्या सुमठाणा येथील एका घरात जुगार सुरु असल्याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच जुगार अड्डयावर धाड टाकून १० जणांना ताब्यात घेत ४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

. पोलीस सूत्रानुसार भद्रावती शहरालगत असलेल्या सुमठाना परिसरातील एका घरात जुगार सुरु असल्याची माहिती एका गुप्तहेराकडून भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करीत घटनास्थळावर धाड टाकली असता तेथे दहा व्यक्ती जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे जवळून नगदी रोख 30 हजार 670 रुपये, ८ मोबाईल व ५ मोटरसायकली असा 4 लाख 97हजार,870 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

. सदर कारवाई भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किटे यांच्या नेतृत्वात अंमलदार शशांक, अनुप, विश्वनाथ चुदरी , निकेश ठेंगे,योगेश आदींनी केली.

error: Content is protected !!