Home Breaking News स्वातंत्रदिनी पत्रकारांना मिळाला दहा लाख रुपयाचा विमा कवच

स्वातंत्रदिनी पत्रकारांना मिळाला दहा लाख रुपयाचा विमा कवच

845
  • सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांचा पुढाकार       
  • स्वातंत्र्य दिनाचे औचित्य

चंद्रपुर

पत्रकाराला समाजाचा आरसा समजल्या जातो . वृत्त संकलना करिता पत्रकारांना अनेक समस्याचा सामना करावा लागतो .  यात कोणतीही दुर्घटना घडल्यास पत्रकारांच अख्खं कुटुंबच उघड्यावर येते . मात्र पत्रकारांच्या वेदना अध्यापही कुणाला कळल्या नाही . पत्रकार  सुरक्षित राहिला तर सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागतात म्हणून पत्रकार व त्यांच्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे . या उद्देशाने  सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी पुढाकार घेत स्वातंत्रदिनी पत्रकारांना  दहा लाख रुपयाचा विमा कवच देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली .

वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते किशोर  टोंगे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या सर्व पत्रकारांना दहा लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी हा उपक्रम राबविला.  समाजाचा आरसा असलेला पत्रकारच आज समाजाकडून दुर्लक्षित झालेला आहे. तेव्हा किशोर दादा टोंगे यांनी दखल घेऊन राबविलेल्या या उपक्रमाबद्दल पत्रकार संघटने कडून कौतुक होत आहे. स्वातंत्रदिनी  पत्रकार बांधवांना एक वर्षासाठी दहा लाखाचे विमा कवच प्रदान केल्याने पत्रकारांनी टोंगे यांचे अभिनंदन केले आहे.  समाजातील पत्रकारांच्या भावना जाणून घेत. शासनापासून उपेक्षीत असलेला पत्रकारांच्या कुटुंबासाठी या पद्धतीचा उपक्रम राबवून  राजकीय क्षेत्रातील बदल दाखवून दिला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विकासात्मक बदल दिसेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी गरजवंतांचे हात मजबूत करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार असून  यानंतर ऑटो संघटना, नगरपालिकेतील सफाई कामगार यांना सुद्धा विमा कवच देणार असल्याचे ही आश्वासन त्यांनी दिले. तर यादरम्यान व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य तथा अपास ग्रुपचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी सर्पमित्रा च्या व्यथा मांडल्या . हे लक्षात घेताच किशोर टोंगे यांनी तात्काळ विशाल मोरे यांना  येत्या नागपंचमीला सर्पमित्रांसाठी सुद्धा विमा कवच  देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

या अनोख्या उपक्रमासाठी वरोरातील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सदर उपक्रम हा आनंद चौक येथील किशोर  टोंगे यांच्या कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात  आयोजित करण्यात आला होता . यावेळी  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  किशोर  टोंगे, उद्घाटक तरुण भारतचे शाम ठेंगडी तर प्रमुख अतिथी म्हणून पुण्यनगरीचे अनिल पाटील हे होते .

कार्यक्रमाचे संचालन शुभम आमने यांनी तर प्रास्ताविक व आभार चेतन लुथडे यांनी मानले .  यावेळी पत्रकार अनिल नौकरकार, रवी खाडे, गांधी बोरकर, विशाल मोरे , सारथी ठाकुर , अविनाश बन , अशोक गाडगे , गोपाल निब्रड, शिरीष उगे , सुरेश जाधव आदि पत्रकार उपस्थित होते .

error: Content is protected !!