जिल्ह्यात दोन दिवसांत एकही नामांकन दाखल नाही

34

Ø दुस-या दिवशी 174 अर्जांची उचल

चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी (दि. 23) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर बुधवारी इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली.

.      विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 16 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 48 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 24 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 27 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 36 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

.      महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.