बल्लारपूर पेपर मिल कर्मचाऱ्याची आत्महत्या

38

न्यू कॉलनी वसाहतीत घडली घटना

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

विसापूर : बल्लारपूर पेपर वसाहतीच्या न्यू कॉलनी मध्ये घरी कोणीच नाही. या संधीचा फायदा घेऊन त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवार (दि.१९) सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. एकनाथ मारोती सुरजागडे (५९) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

.        एकनाथ सुरजागडे यांनी १६ सप्टेंबरला पहिल्या पाळीत कर्तव्य बजावले होते. दरम्यान सोमवारी त्याचे साळभाऊ आत्माराम लटारे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे गेले होते. ते भामरागड येथून पेपर मिल न्यू कॉलनी त्याच्या सदनिकेत आले. त्यावेळी त्यांच्या सदनिकेला आतून कुलूप लावून असल्याचे दिसून आले. यावेळी आत्माराम लटारे यांनी सुरक्षारक्षक यांना पाचारण करून दार उघडले. दार उघडून आत प्रवेश केला असता, एकनाथ सुरजागडे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

.        एकनाथ यांनी दोन दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी. त्यामुळे सदनिकेत दुर्गंधी निर्माण झाली होती. विशेष म्हणजे एकनाथ सुरजागडे यांची पत्नी दोन मुलांना सोबत घेऊन नागपूर येथे वास्तव्याला आहे. ती १६ सप्टेंबरला पतीला भेटायला बल्लारपूर येथे आली होती. पतीला भेटून ती १७ सप्टेंबर ला नागपूर येथे परत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकनाथ सुरजागडे हे १७ सप्टेंबर पासून रजेवर असल्याने त्याच दरम्यान त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.