उपप्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ

597

कर्मचारी अर्धवट ड्युटी करून होतात फरार

रुग्णांचे आर्थिक नुकसान व हाल

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

नेरी

.         चिमुर तालुक्यातील काजळसर येथे उपप्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रात मुख्यालयी आरोग्य सेविका राहत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी एक गरोदर महिला रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र आरोग्य सेविका तीन तास होऊन ही केंद्रात हजर न झाल्यामुळे सदर मातेला चंद्रपूर ला दाखल करावे लागले. परंतु आरोग्य सेविका हजर असती तर तिला तात्काळ उपचार मिळाला असता त्यामुळे गावकर्‍यांत आरोग्य केंद्राबाबत उदासीनता दिसून येत आहे. या केंद्रावर नियमित आरोग्य सेविका द्यावी अशी मागणी होत असून कामाला दांडी मारणाऱ्या सेविकेवर कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.

.         काजळसर येथे मागील वर्षी याच आरोग्य केंद्रात एका मातेने टॉर्च च्या उजेडात बाळाला जन्म दिला होता. ह्या प्रकरणाने आरोग्य विभागाची झोप उडाली होती.  असाच प्रकार काही दिवसापूर्वी एक गरोदर महिला उपकेंद्रात दाखल झाली होती. मात्र केंद्रात तीन तास होऊनही आरोग्य सेविका आलीच नाही. त्यामुळे शेवटी नातेवाहिकांना तिला चंद्रपूर ला दाखल करावे लागले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परंतु स्थानिक ठिकाणी जर आरोग्य सेविका हजर असती तर वाट न पाहता तिला लवकर रेफर मिळाला असता पण आरोग्य सेविका मुख्यालयी हजर राहत नसल्याने असे अनेक प्रकार या उपकेंद्रात पहावयास मिळतात. अनेकदा तक्रारी करूनही आरोग्य विभाग झोपेत असते असे नागरिक बोलीत आहेत.

.         अश्या आरोग्य सेविकेमुळे अनेक रुग्ण हे उपचारापासून वंचित राहत आहे. तसेच खासगी रुग्णालयाची वाट धरतात तेव्हा अश्या कामचुकार सेविकेवर कारवाई करावी व नियमित आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.