मुख्याध्यापकाचा प्रभार दिला मात्र कपाटाची चाबीच दिली नाही

38

तत्कालीन मुख्याध्यापकाचा प्रताप  :  गटशिक्षणाधिकाऱ्याने तोडले कपाटाचे कुलूप

 तत्कालीन मुख्याध्यापका वर काय कारवाही होणार? 

सिंदेवाही

.         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगाव येथील मुख्याध्यापक सागर शंभरकर यांची अन्य ठिकाणीं बदली झाली असल्याने त्यांना शाळेमधून कार्यमुक्त करण्यात आले. परंतु मुख्याध्यापकांचा प्रभार देताना शाळेतील कोणतेही रेकॉर्ड , कपाटाच्या किल्ल्या, न दिल्याने नागरीकांनी गट शिक्षणाधिकारी यांचेकडे मुख्याध्यापकांची मागणी केली. मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने पत्रकार परिषदेतून मागणी करण्यात आली. याबाबत वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिद्ध होताच अखेर शाळेतील कुलूप तोडून कार्यरत शिक्षिका संगीता कुंभारे यांचेकडे मुख्याध्यापकाचा प्रभार देण्यात आला.

.         सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगाव येथे १ ते ४ वर्ग असून दोन शिक्षिका शाळा आहे. मागील दोन महिन्यापूर्वी शाळेतील मुख्याध्यापक सागर शंभरकर यांची अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. व त्याने लगेच कार्यमुक्त सुद्धा करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मुख्याध्यापकाचा प्रभार कार्यरत शिक्षिका यांचेकडे देताना केवळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी बुक दिले. मात्र शाळेतील दखल खारीज, कपाटाच्या किल्ल्या, ऑनलाईन कामाची युजर आयडी, इत्यादी कोणतेही साहित्य दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे शालेय कामे थांबलेली होती. याबाबत ग्रामस्थांनी नवीन मुख्याध्यापकांची मागणी गट शिक्षणाधिकारी यांचेकडे केली. मात्र त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे गावातील काही नागरिक यांनी पत्रकार परिषदेतून शाळेला मुख्याध्यापक द्या , नाहीतर कार्यरत शिक्षिका यांचेकडे प्रभार तरी ध्या. अशी मागणी केली . या मागणीच्या बातम्या वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होताच गट शिक्षणाधिकारी यांनी काही कर्मचारी सोबत घेऊन सायंकाळी पाच वाजता येरगाव येथील शाळेत जावून कपाटाचे कुलूप तोडून सर्व शालेय साहित्य कार्यरत शिक्षिका संगीता कुंभारे यांचेकडे सुपूर्द करून मुख्याध्यापकांचा पूर्णतः प्रभार सोपविला.

.         शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक सागर शंभरकर यांना गट शिक्षणाधिकारी यांनी प्रभार देण्यासाठी पत्र देऊनही त्यांनी प्रभार का दिला नाही.? शाळेचे कुलूप तोडण्याची गट शिक्षणाधिकारी यांचेवर वेळ का आली? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी शाळेला मुख्याध्यापक मिळाले असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कुलूप तोडून प्रभार देताना गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी बावनकर, पळसगाव जाट चे केंद्रप्रमुख सज्जन तेलकापल्लिवार, सरडपार केंद्रं प्रमुख नरेंद्र डेंगे, गडबोरी केंद्र प्रमुख संतोष कुंटावार, पोलीस पाटील सुषमा धुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती राजू सुरपाम, व सर्व सदस्य उपस्थित होते.