घाटे अळीने मोडले नेरी परिसरातील शेतकऱ्यांचे कंबरडे

35

शासनाने सर्व्हे करून धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

 नेरी

.         नेरी परिसरात धान कापणी व बांधणीच्या हंगामाला वेग आला असून नेरी येथील कटारा रीट शेतशिवारातील काशीनाथ चांदेकर यांच्या शेतातील धान पिकाला घाटे अळीने घेरून संपुर्ण पीक उध्वस्त केले असून या उद्धवस्त व जमीनदोस्त झालेल्या धानाचे लोंब व धान जमा करण्यासाठी महिला मजूर कामाला लागल्या असून मागील मागील पाच दिवसापासून दोन एकरात चौदा पोते धान्य जमा केले आहेत तेव्हा किती मोठे नुकसान झाली.

.          यावरून कळून येत आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण परिसरात दिसून येत आहे अनेक शेतकरी हे जमीनदोस्त झालेले धान्य महिला मजुरांच्या हाताने जमा करीत आहेत तर काही शेतकरी हे कापलेल्या धानाला कीटकनाशके फवारणी करताना दिसत आहेत. उभ्या पिकाला घाटे अळी दिसत नसली तरी कापून झाल्यावर अळी लोंब कापताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून हवालदील झाला आहे कारण शेती करण्यासाठी कर्जबाजारी होऊन पीक फुलविले मात्र आता हे फुललेले शेत घाटे अळी उध्वस्त करीत असल्याने ते धान्य उचलण्यास सुद्धा मजुरवर्गाचा खर्च येत आहे एवढे करूनही धान्य मात्र हातात येत नाही. त्यामुळे घाटे अळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे. तेव्हा शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहेत.