चांदाफोर्ट येथे सकाळी पोहचनारी ट्रेन तातडीने सुरु करा

49

संजय गजपुरे यांची मागणी

नागभीड

.         नागभीड रेल्वे स्टेशन येथुन सकाळी सुटणारी ट्रेन तातडीने सुरु करावी अशी मागणी संजय गजपुरे सदस्य, दपुम यांनी केली आहे. सकाळी सुटणारी ही ट्रेन वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही व मुल येथील चाकरमान्यांसाठी तसेच प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशिर होती. आज ही ट्रेन 10 आँगष्ट पासुन अनिश्चित काळासाठी बंद आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे व प्रवाशांचेही अतोनात नुकसान होत आहे. अनेक प्रवाशी सकाळी जिल्ह्याच्या ठिकाणी जावून आपले काम आटोपुन सांयकाळच्या रेल्वेने वापस येत होते. आता जवळजवळ चार महीने होत आहे. अजूनही ही ट्रेन बंदच आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन चांदाफोर्ट येथे सकाळी दहा वाजता पोहचणारी ट्रेन सुरु करावी अशी मागणी संजय गजपुरे ZRUCC सदस्य, दपुम रेल्वे बिलासपुर झोन यांनी केली आहे. तसेच या मार्गावर सुरु असलेल्या गाड्या वेळेवर चालत नसल्याने प्रवाशी परेशान आहेत.

.         दोन ते तिन तास गाड्या नेहमीच लेट होत असल्याने रेल्वेला प्रवाशी मिळने कठीण होणार आहे. रेल्वेने प्रवास करायला प्रवाशी टाळाटाळ करतात. या मार्गावर चालणाऱ्या गाड्या अनिश्चित काळासाठी बंद आहेत. त्या गाड्या पुढील प्रमाने 1) गाडी संख्या नंबर 08806 गोंदिया वडसा मेमु पँसेजर दिनांक 9/8/2023 पासुन अनिश्चित काळासाठी बंद आहे, 2) गाडी संख्या नंबर 08808 वडसा नागभीड चांदाफोर्ट मेमु पँसेंजर दिनांक 10/8/2023 पासुन अनिश्चित काळासाठी बंद आहे. 3) गाडी संख्या नंबर 08805 चांदाफोर्ट नागभीड गोंदिया मेमु पँसेंजर दिनांक 10/8/2023 पासुन अनिश्चित काळासाठी बंद आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्वच गाड्या सुरु कराव्यात आणी प्रवाशांचे हीत जोपासावे.

.          या मार्गावरील गाड्या का बंद ठेवल्या याचे कारण रेल्वे प्रशासनाने दिले की गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरक्षा संबधी कार्य व गाड्या वेळेवर चालवने यात सुधारणा करण्यासाठी वरील तिन पँसेजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. माञ हे कारण पुरेसे नाही.रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्वच ट्रेन पुर्ववत सुरु कराव्यात.