शेतकरी उत्पादक कंपनीचे राज्यातील पहिले जिनिंग वरोऱ्यात

53

     पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन     

वरोरा

.            कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र असलेल्या विदर्भात प्रक्रिया उद्योगाचा अभाव आहे ही उणीव दूर करीत शेतकरी उत्पादक कंपनीचा राज्यातील पहिला जिनिंग प्रकल्प वरोरा येथील कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीकडून उभारण्यात आला. त्या जिनिंग प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

.            14 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून येत्या हंगामापासून या ठिकाणी शेतकऱ्यांकडून थेट कापसाची खरेदी केली जाणार आहे. राज्यात 38 ते 39 लाख आणि एकट्या विदर्भात सुमारे 18 लाख हेक्टर कापसाची लागवड होते. परंतु प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने हंगामात अपेक्षित दर कापूस उत्पादकांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेता वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीने कापसावर प्रक्रिया करीत गाठी बांधण्याचा हायटेक प्रकल्प उभारलेला आहे. सप्टेंबर 2017 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे 2026 भागधारक असून यशवंत सायरे, बळीराम डोंगरकार ,नितीन टोंगे, सुधीर मत्ते , अनुप वासाडे,संजय ढवस, आशा सायरे, कृपाली पंचभाई आदींचा संचालकामध्ये समावेश आहे. बालाजी धोबे सीईओ यांच्या नेतृत्वात कांचनीची टीम कार्यरत आहे. स्मार्ट प्रकल्पातून दोन कोटी चाळीस लक्ष रुपये या प्रकल्पास आतापर्यंत अनुदान मिळाले असून चिनोरा शिवारात हा प्रकल्प 9.6 एकरावर असून 14 कोटी रुपयांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. याच परिसरात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे अंदाजे 288 लक्ष रुपयाचे गोडाऊन बांधकामाचे भूमिपूजन सुद्धा नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. त्या गोडाऊन द्वारे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल शासकीय गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवता येईल व मागणीनुसार योग्य किंमत घेऊन विकता येईल.

.            यावेळी या उद्घाटकीय कार्यक्रमांमध्ये आत्मा प्रकल्प संचालकप्रीती हिरळकर उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लवाटे, उपविभागीय दंडाधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तहसीलदार योगेश कौटकर आदी शासकीय अधिकारी तर नरेंद्र जीवतोडे तसेच कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व शेतकरी तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अधिकारी सुभाष पुजारी यलने प्रतीक मुन कंत्राटदार माना कंस्ट्रक्शन की तरफ से नितीन कळमकर तेजस कळमकर उपस्थित होते.