Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा पोलिसांचा दणका !

वरोरा पोलिसांचा दणका !

17

पावना-मोरवा मार्गावर अवैध दारूविक्रेता जेरबंद

झाडाखाली सुरू होती दारूची विक्री

पोलिसांनी सापळा रचून २२ बॉटल केल्या जप्त

वरोरा : पावना ते मोरवा मार्गावर अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई २६ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली.

.        मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार नरेशकुमार नन्नावरे (ब. नं. २४१४) व पोलीस अंमलदार शरद मस्के (ब. नं. २०६९) हे नंदोरी बिट परिसरात प्रोव्हीजन रेड पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पावना येथील दिलीप गणपत जिलटे (४२) हा पावना ते मोरवा जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडाखाली अवैधरित्या दारूची विक्री करत आहे.

.        या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी सापळा रचला. तेथे संशयित आरोपी हातात कापडी पिशवी घेऊन उभा असताना पोलिसांना दिसून आला. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, पिशवीत प्रत्येकी ९० मि.ली.च्या २२ नग देशी दारूच्या सिलबंद प्लास्टिक शिश्या आढळल्या. जप्त केलेल्या या दारूची किंमत सुमारे ८८० रुपये आहे.

.       आरोपीकडे दारू बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याने पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. सायंकाळी ५.०० ते ६.१५ वाजेदरम्यान पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी दिलीप गणपत जिलटे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!