Home चंद्रपुर जिल्हा विशेष खा. प्रतिभा धानोरकर यांची आयुध निर्माणी चांदा प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक

खा. प्रतिभा धानोरकर यांची आयुध निर्माणी चांदा प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक

7

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा

प्रेंटिस विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य

अनुकंपा भरती आणि भद्रावतीसाठी सीएसआर फंड देण्याबाबत प्रशासनाचे सकारात्मक संकेत

भद्रावती : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुध निर्माणी चांदा (Ordnance Factory Chanda) प्रशासनासोबत बैठक घेऊन कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत स्थानिक युवकांपासून ते कामगारांच्या हिताच्या अनेक विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

.      बैठकीत प्रामुख्याने स्थानिक आयुध निर्माणीत ॲप्रेंटिस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य देणे, प्रलंबित असलेले अनुकंपा धारकांचे प्रश्न मार्गी लावणे आणि स्थानिक कंत्राटदारांना कारखान्यातील कामांमध्ये प्राधान्य देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली. तसेच, रामटेके सोसायटीतील नागरिकांच्या सोयीसाठी बाहेर जाण्याकरिता गेट बसवणे आणि प्रशासनाचा ‘सीएसआर फंड’ (CSR Fund) भद्रावती शहर व तालुक्याच्या विकासासाठी खर्च करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

.     यावेळी आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर पांडे यांनी सर्व विषयांवर प्रशासन सकारात्मक असून समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. काही प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने, खासदार धानोरकर यांनी स्वतः शासन स्तरावर या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

.     बैठकीपूर्वी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार महोदयांचे स्वागत करून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या बैठकीला जनरल मॅनेजर पांडे, वरिष्ठ अधिकारी, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, शहर अध्यक्ष सूरज गावंडे, सुनील नामोजवार, सीमा पवार, पल्लवी तामगडे, सुनील खोब्रागडे, सुयोग धानोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!