प्रजासत्ताक शिक्षक संघटना तालुकास्तरीय कार्यकारिणी गठीत

42

ब्रह्मपुरी

.           डॉ.आंबेडकर विद्यालय ब्रह्मपुरी येथे, प्रजासत्ताक शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रजासत्ताक शिक्षक संघटना तालुकास्तरीय सभा आयोजित करण्यात आली.या सभेला अध्यक्ष म्हणून मारोती पाटील उपस्थित होते.प्रमुख अतिथी रवींद्र मोटघरे,प्रमुख मार्गदर्शक.श्रीरामे,. नंदेश्वर तसेच साठे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक चाचरकर उपस्थित होते.

.           सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना,अगरबत्ती,पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमास बहुसंख्य शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते बोलत असताना शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अडचणी समस्या यावर चर्चा करण्यात आली आणि त्या-त्या समस्येचा निराकरण लवकरात लवकर करून सोडविण्यात येतील असे बोलण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा, प्रजासत्ताक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मारोती पाटील यांच्या हस्ते तालुकास्तरीय कार्यकारणी संघटना गठीत करण्यात आली. सर्वप्रथम जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून पी.एस नगराळे यांची निवड करण्यात आली.उपस्थित शिक्षकांमधून तालुका अध्यक्ष.यू .पी. राठोड ,उपाध्यक्ष एन एम.बोरगरे ,कार्याध्यक्ष.पी.वाय.रामटेके ,सचिव जे.आर वाघमारे ,सहसचिव मनोरंजन धोंगडे कोशाध्यक्ष बी. व्ही. जगनकर ,प्रसिद्धी प्रमुख म्हणून.पी.डब्ल्यू पेंढारकर ,संघटक म्हणून एस.एम.भडके ,तसेच महिला वर्गातून महिला प्रतिनिधी म्हणून पी.एच. भैसारे ,व,जी.पी.समर्थ यांची निवड करण्यात आली.सर्वानुमते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची मंजुरी देण्यात आली.आणि अध्यक्ष महोदयाच्या हस्ते सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.आणि पुढील कार्याबद्दल शुभेच्छा देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यू .पी राठोड यानी तर आभार प्रदर्शन पद्माकर रामटेके यानी केले.त्यानंतर भारतीय संविधानाचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.