Home सामाजिक आनंदवन वरोरा येथे शासकीय योजनांच्या तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन

आनंदवन वरोरा येथे शासकीय योजनांच्या तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन

427

१२ ते १४ मार्च दरम्यान आयोजन

शासनाच्या कल्याणकारी योजनांची सर्वसामान्य नागरिकांना मिळणार माहिती

चंद्रपूर : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसिध्दी व्हावी आणि नागरिकांना या योजनांची सविस्तर माहिती मिळून त्याचा प्रत्यक्ष लाभ घेता यावा, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आनंदवन (वरोरा) येथे तीन दिवसीय विशेष छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

.     सदर प्रदर्शनी आनंदवन येथील ‘मुख्यमंत्री सभागृह’ येथे आयोजित करण्यात आली असून, दि. १२, १३ व १४ मार्च या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ती सर्व नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

.      या प्रदर्शनीचे उद्घाटन आज १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वरोराचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप भस्के यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी तहसीलदार योगेश कौटकर आणि आनंदवनच्या अंतर्गत व्यवस्थापन प्रमुख डॉ. पल्लवी आमटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

.      प्रदर्शनीच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच १४ मार्च रोजी आनंदवन येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे.

.      “शासकीय योजनांची माहिती अभावी अनेक नागरिक लाभापासून वंचित राहतात. या प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व योजना समजावून घेण्याची ही चांगली संधी आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!