आलमारीच्या आधाराने मुली व पत्नीचा जीव वाचला.
सिंदेवाही
. नुकत्याच झालेल्या सिंदेवाही तालुक्यातील मुसळधार पावसाने अचानक मध्यरात्री झोडपल्यानंतर घर कोसळत असतानाच जाग आल्याने संपूर्ण कुटुंब बचावल्याची थरारक घटना सिंदेवाही तालुक्यातील सिंगडझरी येथे शनिवारी घडली. थोडाही उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
. सिंगडझरी येथील रेवननाथ लक्ष्मण पोवनकर हे पत्नी व दोन मुलींसह जेवण करून झोपी गेले.असता सततच्या पावसामुळे घराची जमीन पूर्ण दलदल झाली होती. घर कोसळणार नाही, या आशेवर सर्व निद्रावस्थेत गेले. दरम्यान, रात्री अचानक पाऊस पडल्याने कवेलू व माती कोसळु लागली .त्यावेळेस रेवनाथला जाग येताच त्याने घरातील आलमारीचा आसरा घेत दोन मुली व पत्नीला वाचविले. खाटेच्या बाजूला आलमारी उभी असलेल्या आलमारीला पकडून ठेवले व पत्नीला जागे केले तिने आरडाओरड करताच शेजारचे कुटुंब मदतीला धावून आले आणि सर्वांना बाहेर काढले. या घटनेची माहिती संबंधित प्रशासनाला देण्यात आली आहे. नुकसान ग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे .
. सिंगडझरी येथील रेवनाथ लक्ष्मण पोवनकर या व्यक्तीच्या घराची पडझडी नुकसानी बाबत तलाठी यांनी पंचनामा केला असून तहसील कार्यालय सिंदेवाही येथे माहिती अहवाल प्राप्त झाला असून याबाबत शासनाला माहिती कळवली आहे . शासनाकडून संबंधित पडझड नुकसानी बाबतची निधी येताच तात्काळ देण्यात येईल. शुभम बहाकर, तहसीलदार, सिंदेवाही