वरोरा : स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोराचे खेळाडू निलेश अरविंद मते यांची भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब च्या वतीने त्यांचा सह पत्नी कसत्कार करण्यात आला.
. निलेश अरविंद मत्ते स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब वरोराचे खेळाडू प्रशिक्षक व पदाधिकारी या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर ते व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून नागपूर येथील महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाली. ही वरोरा वासियांसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली. भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक निलेश अरविंद मते व त्यांच्या पत्नी रूपाली मध्ये यांचा स्फूर्ती स्पोर्टिंग क्लब च्या वतीने स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर आर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
. यावेळी मंचावर स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे सचिव सुनील जवदंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापकप्रयाग ठाकरे यांनी केले तर उपस्थिताचे आभार स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण खिरटकर यांनी मानले. यावेळी स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे खेळाडू पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची सराव शिबिर गांधीनगर गुजरात मध्ये असून व्ही ए तनाम या देशात आयोजित आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय महिला व्हॉलीबॉल संघ मुख्य प्रशिक्षक निलेश मते यांच्या मार्गदर्शनात सहभागी होणार आहे.


