पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा चंद्रपूरात निषेध

7

मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना वाहली श्रद्धांजली

चंद्रपुर : पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने चंद्रपूरात बुधवारी मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाना श्रद्धांजली वाहत दहशतवादी वृत्तीचा निषेध करण्यात आला.

.      शिवसेनेचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, विधानसभा आमदार व पक्ष सचिव मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादीनी केलेल्या भ्याड हलयाचा निषेध करण्यात आला. तसेच दोन मिनिट मौन पाळत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाना श्रद्धांजली देण्यात आली.

.      यावेळी चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे, महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, दीपक बेले, अविनाश उईके, उपजिल्हाप्रमुख माया मेश्राम, विधानसभा प्रमुख  सीमा रामेडवार, शहर प्रमुख वाणी सदालावार, उपशहर प्रमुख अंजु लेनगुरे, उपशहर प्रमुख शैलेश सदालावार, मनीद येरेवार, तरुण येनगंटीवार, सूचक दखणे, राजू ऐटलावार, जफर बेग, नयन जंगम आदींची उपस्थिती होती.