Home चंद्रपुर जिल्हा विशेष जुगार अड्डावर बल्लारपूर पोलिसांची धाड

जुगार अड्डावर बल्लारपूर पोलिसांची धाड

980

११ जणांना अटक

१ लाख ७८ हजारांवर ऐवज जप्त

बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलच्या मागील बाजूला वर्धा नदी तिरावर कटपत्ता जुगार खेळला जात होता. याची माहिती पोलिसांना झाली. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून ११ जणांना जाळ्यात अडकवले. त्यांचेकडून १ लाख ७८ हजार 300 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केली.

.      या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वतन लटारु कांबळे, रा. बाबुपेठ चंद्रपूर, चंद्रशेखर निषाद, भारत भगवान भटकर, कुमारस्वामी नेलय्या, रामसिंग निषाद, ज्ञानेश्वर तुराणकर, निखिल रणदिवे सर्व रा. बल्लारपूर, अनेक इंदलवार रा. लालपेठ चंद्रपूर, करण पादे रा. विसापूर, सुरेश केवट, रा. लालपेठ चंद्रपूर, शरपोधीन शाह, रा. राजुरा, ईश्वर ठाकरे, रा. आंबेडकर चौक राजुरा यांना ताब्यात घेतले.

.    बल्लारपूर येथील निखिल रणदिवे हा वर्धा नदी लगत कटपत्ता जुगार अड्डा चालवत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत तब्बल ११ जणांना जुगार खेळताना पकडून जेरबंद केले. विशेष म्हणजे या जुगार अड्ड्यावर चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा येथील जुगार शौकीन कटपत्ता जुगार खेळण्यासाठी आल्याचे पोलीस तपासणीत आढळून आले. जुगार खेळणाऱ्यांकडून १ लाख ७८ हजार 300 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात कलम १२ ( अ ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.      ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मधुकर सामलवार, संतोष निंभोरकर, सुनील गौरकार, धनराज खरकाडे, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, नितीन कुरेकार, प्रशांत नागोसे, प्रफुल्ल गजघाटे यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!