Home सामाजिक शिवापुर (बंदर) येथील आंतरजातीय जोडप्याचा पुण्यात सत्कार

शिवापुर (बंदर) येथील आंतरजातीय जोडप्याचा पुण्यात सत्कार

1114

चिमूर : विचारवेध असोसिएशन पुणे द्वारा ‘आयोजित संमेलनात आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्याचा सत्कार करण्यात आला. या मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिवापूर बंदर येथील स्नेहा आणि निलेश यांचा मानपत्र व ज्ञानपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

.    भारतात वर्ग आणि जात एकत्र आणुन स्त्रोतांवर मक्तेदारी गाजविण्यात येत आहे.हे मिश्र प्रारूप घातक आहे. मागास वर्गाचे शोषण केले जात आहे.हे प्रारूप समजून घेऊन बदलल्याशिवाय त्यावर मात करता येत नाही. जातीची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे.दक्षिण आशियात जात ही व्यवस्था पितृसत्ताक संस्कृतीवर आधारित आहे. त्यांचे विश्लेषण केले पाहिजे. जातीवादाच्या विरोधात आंदोलन करूनही उपयोग होत नाही.याचे कारण हे प्रारूप विवाहाशी जोडले गेले आहे.

.   त्यामुळे हे प्रारूप पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत जाते संघर्षासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे.या संमेलनात जातीनिहाय जनगणना, आरक्षण, प्रसारमाध्यमे, जातीचे अर्थशास्त्र आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या जाती व्यवस्थेचे निर्मूलन करण्यातील पहिली पायरी म्हणजे आंतरजातीय विवाह त्याशिवाय गत्यंतर नाही. याच विचारावर या दोघांनी आंतरजातीय विवाह केला त्याकरिता यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!