कांदा अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची खाते गोठवली

38
  • बाजार समिती कर्मचारी, व्यापारी मस्त : शेतकरी त्रस्त
  • कांदा प्रकरणाला राजकीय वळण
  • राजुरकरांचा सोशल मीडियावर आंदोलनाचा इशारा

चंद्रपुर

वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीतीत कांदा अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस येताच आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पणन मंत्र्याकडे तक्रार दाखल केली याची दखल घेत कांदा अनुदानाची चोकशी सुरू झाली. अनुदान प्राप्त शेतकऱ्यांची बँक खाती चौकशी होत पर्यंत गोठवली गेली आहे. यामुळे भाजपचे रमेश राजूरकर यांनी बँक खाते त्वरित सुरू करा. शेतकर्यां वर होत असलेला अन्याय खपवून घेणार नाही अशी मागणी करून सोशल मीडियावर कुणाचेही नावे न घेता तक्रार कर्त्याना शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा दिल्याने कांदा प्रकरणाला राजकीय वळण आल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी 23 ते मार्च 23 या कालावधीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार परवानाधारक व्यापारी नाफेड यांच्याकडे कांदा विकला त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केले. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने अनुदानास पात्र असलेल्या 676 लाभार्थ्यांची यादी तयार केली. त्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2 कोटी तीस लाख 73 हजार रुपये जमा झाले.

वरोरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी आणि व्यापार्यां नी मिलीभगत करत शेतकर्यां च्या कागदपत्राचा गैरवापर करून कांदा उत्पादक नसताना ७०-३० टक्के असे समीकरण करून शासनाच्या तिजोरीला चुना लावला. याबाबत वरोरा भद्रावती विधानसभेच्या आमदार प्रतिभा धांनोरकर यांनी आवाज उचलत पणन मंत्र्याकडे तक्रार दाखल केली होती. याची दाखल घेत चोकशी समिति गठित करण्यात येऊन शेतकर्यांंचे खाते गोठविले. मात्र शेतकर्यांिनी मी कांदा लावलाच नाही मात्र खात्यात कांदा अनुदान खात्यामध्ये जमा करण्यात आले. त्याचे ७० टक्के रक्कम व्यापर्यांंना देण्यात आली आता शेतकर्याअचे खाते गोठवण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता अडचणीतआला आहे. या शेतीच्या हंगामामध्ये सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे आणि वारंवार या शासकीय चौकशीमुळे मानसिक त्रास शेतकऱ्यांचा वाढला आहे. जर या शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर जबाबदार कोण ?. असा प्रश्न भाजपाचे रमेश राजुरकर यांनी सोशल मीडियावर केला आहे. यामुळे कांदा प्रकरणाला राजकीय वळण आल्याने राजकीय संघर्ष शिगेला पोहचण्याची चिन्हे दिसू लागली आहे.