नागरिकांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वितरण
एस.आई.आर.जागृती शिबीर
बल्लारपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बल्लारपूर येथील त्रिशरण बुद्ध विहार, विद्या नगर वॉर्डात भारताचे माजी पंतप्रधान व संगणक क्रांतीचे जनक राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य नागरिकांना संविधान प्रास्तविकेचे वितरण आणि मतदार पुर्ननिरीक्षण अंतर्गत शिबीर पार पडले. कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष डॉ. अलका अनिल वाढई यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रेणुका कोकाटे, नगरपरिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ, न.प.उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, शहर कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम,नगरसेवक मोना धानोरकर,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई, कैलास धानोरकर, त्रिशरण बुद्ध विहार अध्यक्ष संदीप मेश्राम, महिला मंडळ अध्यक्ष कविता जुमडे,माजी नगरसेवक गणेश कोकाटे, प्रा.विनय कवाडे यांची उपस्थिती होती.
. दरम्यान मतदार पुर्ननिरीक्षण अंतर्गत शिबीर मध्ये दादाभाई नौरोजी वॉर्ड व महाराणा प्रताप वॉर्डातील नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असलेल्याची खात्री करून घेत शिबीरात उपस्थिती दर्शवली. यावेळी वार्डातील बि.एल.ओ.नी सहकार्य केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू मारगमवार,सोमय्या जक्कु,संदेश दहेगावकर,शुभम दिवसे,गणेश चौव्हान,अशोक दंडेलवार,जयराज ढेकले,रशीद शेख,धर्मा महाकाली, राकेश शिवणकर, आदींनी सहकार्य केले.


