Home सामाजिक धामणगाव अग्नी तांडवातील पीडितांना भद्रावतीतील सामाजिक संस्थांतर्फे मदतीचा हात!

धामणगाव अग्नी तांडवातील पीडितांना भद्रावतीतील सामाजिक संस्थांतर्फे मदतीचा हात!

1

‘हेल्पिंग हँड्स NGO’ आणि ‘भीम आर्मी’ धावले मदतीला

धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे गावात वाटप

भद्रावती : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एक भीषण आग लागली. या दुर्घटनेत गावातील अनेक घरे आणि गोठे जळून खाक झाले. आगीच्या या तांडवामुळे अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले असून, गोठ्यात अडकलेली गुरे-ढोरे व शेळी-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. या भीषण आपत्तीमुळे सध्या संपूर्ण धामणगाववर दुःखाचे सावट पसरले आहे.

.      या संकटसमयी पीडित कुटुंबांना धीर देण्यासाठी भद्रावती शहरातील “हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती NGO” आणि “भीम आर्मी एकता मिशन, भद्रावती” या संस्था तातडीने पुढे आल्या आहेत. दोन्ही संस्थांच्या वतीने पुढाकार घेत धामणगाव येथील गरजू कुटुंबांपर्यंत धान्य, लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, भांडी, कपडे आणि इतर सर्व जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात आल्या. या संकटकाळात दोन्ही संस्थांनी राबविलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम प्रतीक ठरला आहे.

.       हे मदत अभियान यशस्वी करण्यासाठी भीम आर्मीचे महाराष्ट्र महासचिव तथा जिल्हा प्रभारी शंकर मून, जिल्हाप्रमुख जितेंद्र डोहणे, जिल्हा उपाध्यक्ष अजय गजभिये, भद्रावती तालुकाप्रमुख अतुल पाटील, अजेंद्र ढोक, स्वाती मोरे, अश्विनी पाटील आणि अधिरा पाटील यांनी परिश्रम घेतले.

.        तसेच हेल्पिंग हँड्स NGO चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद वाघमारे, कृतांत सहारे, प्रणय वाघमारे, कनिका सिकदर, महादेव दुपारे, मायाताई कोसे, देवानंद भाऊ पेटकर, एड. बोधिनी बोरकर, सोनल तेलंग, पंचफुला खोब्रागडे, रुपेश रामटेके, हेमंत वाघमारे, चंदन पेटकर, वंदना मून, रोशन रणवीर, किरण कवाडे, सुकेशनी रामटेके, राजेश, दीपक, भाग्यश्री थुलकर, राणी पाल, सुमेध कोठाडे, मीनल मून, तारकेश्वरी फणसे, अमोघ, सोनाली वाघमारे, प्रतीक मोबाईल शॉपी, शिल्पा, शुभम, अमिता, गुड्डू, भाऊराव, प्रशांत सातपुते, कैश शेख, सागर निरंजन, राजरत्न पेटकर, रिता सहारे, स्नेहा दारुंडे, तुषार दुर्गे, लीना उराडे, प्राची वेल्हेकर, अनिकेत बांबोडे, सुकेशनी मानकर, जया सपाटे आदींनी मोलाचे सहकार्य केले. समाजातील अशा एकत्रित प्रयत्नांमुळे पीडित ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून मानवतेचे एक सुंदर उदाहरण समोर आले आहे.

error: Content is protected !!