Home सामाजिक ३८ वर्षांनंतर जुळला मैत्रीचा सुरेल संगम

३८ वर्षांनंतर जुळला मैत्रीचा सुरेल संगम

338

कर्मवीर विद्यालयाच्या १९८७-८८ बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

वरोरा येथे माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा

खेळ, गाणी आणि गप्पांनी रंगली सायंकाळ

वरोरा : काळाच्या ओघात विखुरलेले सवंगडी तब्बल ३८ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले आणि शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा मिळाला. कर्मवीर विद्यालय, वरोरा येथील १९८७-८८ या दहावीच्या बॅचमधील मित्र-मैत्रिणींचा स्नेह सोहळा नुकताच (२९ मार्च २०२६) स्थानिक शगुन मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात पार पडला.

दोन सत्रांत रंगला कार्यक्रम
हा सोहळा दोन सत्रांत विभागला होता. पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वानखडे, ठाकरे, गाटकीने, परचाके, भोंगळे, भोयर, ठेंगणे, डाखोरे आणि बरबटकर यांची उपस्थिती होती. सरस्वती पूजन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात झाली. रेखा पोतराजे (डोळस) यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर इरदंडे यांनी प्रास्ताविक मांडले. संजय पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मनोरंजन आणि आठवणींची शिदोरी
दुसऱ्या सत्रात जणू मैत्रीचा वसंत फुलला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली, तर काहींनी स्वरचित कविता आणि सुश्राव्य गीतांचे सादरीकरण केले. महिलांसाठी संगीत खुर्ची आणि लगोरी यांसारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या गाण्यांवर ठेका धरत सर्वांनी नृत्याचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मित्र-मैत्रिणींनी प्रत्यक्ष कर्मवीर विद्यालयाला भेट देऊन जुन्या वर्गखोल्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यांचे लाभले सहकार्य
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेश निखाडे, विजय पिंपळकर, विश्वजीत देवनाथ, संजय बंड, मिलिंद चिमूरकर, प्रशांत पाटील, अजय उके, अजय वंजारी, कालू कटारे, दिलीप पडवे, पांडुरंग नागदेवते, देवराव नगराळे आणि कल्पना पर्वत (येरणे) यांनी अथक परिश्रम घेतले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आल्याने हा सोहळा सर्वांच्या मनात कायमची आठवण कोरून गेला.

error: Content is protected !!