भव्य भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध
जिल्हा बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्याकडून बाबांच्या चरणी सुख-समृद्धीचे साकडे
अनेक मान्यवरांची उपस्थिती
वरोरा : वरोरा नगरीत श्री खाटू श्याम बाबांच्या असीम कृपेने आयोजित ‘भव्य श्याम भजन संध्या’ अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली. फुलांची वर्षा, अखंड ज्योत आणि बाबांचा अलौकिक दरबार यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
. या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अशा मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले, त्याबद्दल मी बाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान लाभो, हीच बाबांच्या चरणी प्रार्थना.”![]()
सागर व्यास यांच्या भजनांनी रसिक भारावले
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हैदराबाद येथील प्रसिद्ध भजन गायक सागर व्यास हे होते. त्यांच्या सुमधुर आवाजातील भजनांनी भाविकांच्या मनाला वेगळीच शांती आणि प्रसन्नता दिली. उपस्थित हजारो भक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जयघोषात या भक्ती सोहळ्याचा आनंद लुटला.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, जिल्हा बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेंभुर्डे, शिवसेनेचे (चंद्रपूर-वणी-आर्णी) लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, नगरपरिषद वरोरा च्या नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, नगरपरिषद बांधकाम सभापती मनीष जेठानी, उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे खासदार प्रतिनिधी सुभाष दांदडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.
![]()


