प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांचे प्रतिपादन
विसापूर येथे चिंतामणी विद्यालयात सांस्कृतिक संमेलन
बल्लारपूर : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम महत्वाचे आहे. यामुळे त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना मिळते. आत्मविश्वास बळावतो. जिद्द व चिकाटीने आपल्यातील कलाविष्काराचे सादरीकरण करतो. यासाठी सांस्कृतिक संमेलन महत्वाचे आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या कलात्मक जडणघडणीत सांस्कृतिक महोत्सवाची जोड महत्वाची भूमिका पार पाडते, असे प्रतिपादन चिंतामणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल विसापूरचे प्राचार्य प्रशांत दोंतुलवार यांनी कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी केले.
![]()
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चिंतामणी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शाळेच्या प्रांगणात शनिवारला वार्षिक सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उदघाटक म्हणून विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, अध्यक्ष प्राचार्य प्रशांत दोंतुलवार, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते राजू लांडगे, युवा नेते संदीप पोडे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देविदास तुंगिडवार,शिक्षक अरुण टोंगे यांची उपस्थिती होती.
. यावेळी चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक वसंतराव दोंतुलवार, माजी अध्यक्ष स्व. डॉ. वैभव दोंतुलवार व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती, आदीवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंडीनृत्य, चित्रपट संगीतावरील नृत्याविष्कारांने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कलात्मक पद्धतीने नाटीका सादर करून प्रबोधन केले. वेगवेगळ्या संस्कृतीचे नृत्य सादरीकरणाने अंतर्मुख होण्यास पालकांना व प्रेक्षकांना दाद देण्यास विद्यार्थ्यांनी भाग पाडले.लावणी नृत्य, भारुड नृत्याने प्रेक्षक सुखावले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक अरुण टोंगे यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन श्रद्धा साखरकर यांनी केले. सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत पावडे,विना चांदेकर, सुंभागी बरडे,ललिता पोडे, संगीता उमरे,विजय सातपुते, सोनाली आत्राम, संतोषी तगलपल्लीवार,विकास कल्लुरवार,मुन्नालाल पुंडे,सुभाष भटवलकर, रविंद्र कोडापे, विलास देठे आदींनी सहकार्य केले.

