शेतातील लोखंडी विद्युत पोल चोरट्यानी पळविले

8

नवतळा येथील घटना

नेरी : चिमूर तालुक्यातील नवतळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले तीन लोखंडी पोल अज्ञात चोरट्याने जेसीबीच्या सहाय्याने उखडून लंपास केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 16 मे रोजी सकाळी उघडकीस आली.

.      प्रकाश पांडुरंग मासुरकर व प्रदीप जागेशवर हरडे यांच्या शेतात तीन लोखंडी विद्युत पोल उभे होते. ते जेसीबी च्या साहाय्याने लाईनमेन यांनी कुठलीही माहिती शेतकऱ्यांना न देता चोरून नेले असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यासंबंधी तात्काळ उपकार्यकारी अभियंता, विद्युत विभाग चिमूर यांना अर्जाद्वारे माहिती देऊन लाईनमेन आणि सहकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

.        सविस्तर असे की, नवतळा येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात पनास वर्षांपूर्वी पासून विद्युत पुरवठा करणारी विद्युत पोलची जोडणी केलेली लाईन टाकली होती. अनेक वर्षांपूर्वी कनेक्शन दिले असेल नंतर काही वर्षांनी कनेक्शन काढले असेल तेव्हापासून शेतात पोल उभे आहेत. मात्र सदर लोखंडी पोल स्थानिक लाईनमेन दोडके आणि त्यांचा सहकारी राजेश्वर चौधरी यांनी शेतकऱ्यांना कुठलीही माहिती न देता दि 14 ला पोल शेतात पाडून ठेवले आणि 15 मेला रात्री जेसीबीच्या साहाय्याने उचलून चोरून नेले. यामध्ये शेतातील कडूनीबाचे झाड सुद्धा उकडून पाडले आणि नुकसान केले. दि 16 ला संपूर्ण प्रकरण उघडीस आले. असा हा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून सदर चोरट्यावर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

.      या विद्युत पोल संदर्भात गावात लोकांनी लाईन मेन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नेले असल्याची माहिती मिळाली असता त्यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता सदर बाबतीत शेतकऱ्यांना विचारण्याची काहीही आवश्यकता नाही तसेच माहिती देता येत नाही सदर पोल हे वीज वितरण विभागाचे आहे ते आम्ही नेऊ शकतो त्याच्याशी तुमचा कुठलाही संबंध नाही असे उलट उत्तर दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर बाबतीत उपकार्यकारी अभियंता चिमूर येथे तक्रार दाखल कारवाईची मागणी केली आहे यापूर्वी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पोल चोरून नवीन कनेक्शन वाल्या शेतकऱ्यांना विकले असल्याचे प्रकार घडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे तेव्हा हा गोरखधंदा वीज वितरण कंपनी ला माहिती नसावे अशी चर्चा असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रकाश मासुरकर व प्रदीप हरडे या शेतकऱ्यांनी केली आहे.