दोन दुचाकीची समोरासमोर धडक

5

एक ठार : एक गंभीर

जामनी-तळेगाव फाट्यावरील घटना

वरोरा : विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर जबर धडक बसली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याचेवर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सूरू आहे. सदर घटना शनिवारी (दि. २६) ला रात्री ९.30 वाजण्याच्या दरम्यान चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील जामनी-तळेगाव फाट्यावर घडली. महेश पद्माकर भोंगळे (२८) रा. मजरा असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर सचिन रमेश बोरसरे (३८) रा. तळेगाव असे गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

.     प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील तळेगाव येथील सचिन बोरसरे हा शनिवारी रात्री ९.30 वाजण्याच्या सुमारास टेमुर्डा येथील पेट्रोल पंपवरून पेट्रोल टाकून गावाकडे परत जाण्यासाठी निघाला असताना त्याच मार्गाने महेश भोंगळे हा विरुद्ध दिशेने हिरोहोंडा दुचाकीने मजरा (खु) येथे जात असताना तळेगाव फाट्यावर दोघांचीही दुचाकी एकमेकांना धडकली. या भीषण अपघातात महेश भोंगळे या तरुण युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन बोरसरे गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.