दुल्हेराजाची अनोखी अदा

5

कुचना : इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे. नको लावूस फास गळा बळीराजा, तूच आहेस या देशाचा पोशिंदा. अन्नधान्य पिकवेल शेतकरी तर देशात नांदेल सुखसमृद्धी, हा उपदेश देत एका खरड्याच्या पाट्या तयार करून त्या हातात घेत नवरदेवाने बैल बंडीवर अनोख्या पद्धतीने लग्नाची वरात काढली. या स्लोगणाच्या माध्यमातून त्यांनी जगाच्या पोशिंदा बळीराजाला जणू संदेशच दिला. शेतकरी जगेल तर देश टिकेल. अशा वेगवेगळ्या स्लोगन लिहून त्यांनी सगळ्यांचे मन वेधून घेतले. चक्क बैल बंडी स्वतः हाकलत तो नवरीच्या मंडपात पोहचला आणि सारेच अवाक होत या नवरदेवाकडे पाहू लागले. भद्रावती तालुक्यातील कुचना येथील माजी उपसरपंच आणि स्वतः शेतकरी असलेला नवरदेव मनोज तिखट या युवकांने अनोखी अदा दाखवीत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.

छायाचित्र : संदीप झाडे, कुचना, माजरी