ब्रम्हपुरी : बौद्ध विहार सेवा समिती ब्रह्मपुरी च्या वतीने स्थानिक सम्राट अशोक चौक येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, सम्राट अशोक व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
. या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांचे प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून दीप प्रज्वलित करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नेताजी मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक चंदन नगराळे व ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शकांनी समाज सुधारणेतील महामानवांनी दिलेल्या योगदान बद्दलची माहिती व जीवनकार्य यावर प्रकाश टाकला तर अध्यक्ष स्थानावरून पत्रकार नेताजी मेश्राम यांनी जयंती साजरी करत असताना विचारांचा वारसा सम्राट अशोकांप्रमाणे तरुणांनी प्रचारित आणि प्रसारित केला पाहिजे तरच ती जयंती सार्थकी ठरेल असे प्रतिपादन केले. निधी नरेश रामटेके यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर मौलिक भाषण केले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते नरेश रामटेके यांनी तर आभार मनोज धनविजय यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बुद्ध विहार सेवा समिती सम्राट अशोक येथील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.