सर्व जातीधर्मीय समाज जोडो अभियान
जिजाऊ रथयात्रा दुभंगलेली मन जोडणारी नवसंजीवनी
चंद्रपूर : शिव, शाहु, फुले,आंबेडकरांचा वारसा जपत मराठा सेवा संघ ही पुरोगामी चळवळ समता बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था आपल्या तेहत्तीस कक्षाच्या माध्यमातून युवक-युवती, विद्यार्थी, शेतकरी, महिला-पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी, समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात बंधूभाव जपत आपल्या ऐक्याचा जागर घालण्यासाठी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथयात्रा १८ मार्च ते १ मे दरम्यान महाराष्ट्र भर सर्व जातीधर्मीय समाज जोडो अभियान हे ब्रीद घेऊन जिजाऊ रथयात्रा फिरत आहे.
. ही रथयात्रा १० एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. ही रथयात्रा दुपारी २.३० वाजता वरोरा , ३.३० वाजता भद्रावती, ४ वाजता घोडपेठ, ४.३० मोरवा, ५ वाजता पडोली, ५:३० वाजता संत तुकाराम महाराज चौक व सायंकाळी ६ वाजता ही रथयात्रा व रॅली जनता कॉलेज चौकापासून जुना वरोरा नाका चौक उड्डाणपूल रामनगर पोलिस ठाणे-बसस्थानक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदान येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी ७ वाजता सभा येत आहे.
. या रथयात्रेत सहपरिवार सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाचे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्यउपाध्यक्ष रामचंद्र सालेकर, प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिपक खामनकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा दिलीप चौधरी, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अर्चना चौधरी, संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष विनोद थेरे तसेच मराठा सेवा संघाच्या सर्व ३३ कक्षाचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.