वस्तू विकत घेतांना जागृक रहा – तहसीलदार राजेश भांडारकर
तहसील कार्यालय भद्रावती येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा
भद्रावती : एम.आर.पी. विषयी माहिती देत एम.आर.पी. ही फसवी असून ही ग्राहकाला लुटणारी आहे. याविरोधात ग्राहक आंदोलनाची गरज असून ग्राहकांनी यासाठी एम.आर.पी. रद्द करण्याची मागणी शासनाला करावी असे वक्तव्य अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सचिव, प्रवीण चिमुरकर यांनी केले.
. तहसीलदार राजेश भांडारकरांनी वस्तू विकत घेतांना ग्राहकांनी जागृक राहण्याची गरज आहे. वस्तू वरिल अंतिम तारीख, समाविष्ट सामग्री पाहून वस्तू विकत घ्यावी असे संबोधित केले.
. तहसील कार्यालय भद्रावती येथे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सचिव प्रवीण चिमुरकर तसेच अध्यक्ष, बालाजी दांडेकर, माजी अध्यक्ष, वामन नामपल्लीवार, प्रा. विवेक सरपटवार यांची उपस्थिती होती.
. ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा विकत घेतली आणि त्यामध्ये समस्या आढळून आल्यास त्याची तक्रार करू शकतो हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. तर वामन नामपल्लीवार आणि बालाजी दांडेकर यांनी ग्राहक चळवळी विषयी प्रा. विवेक सरपटवार यांनी माहिती दिली.
. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार, आकनुरवार यांनी केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य, पदाधिकारी तसेच रेशन दुकानदार आणि मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.
तहसील कार्यालय परीसरात कागदी कपात चहाला बंदीग्रा हकाने कागदी कप आणि त्यापासून होणाऱ्या कर्करोगाचा प्रश्न उपस्थित केला. याविषयी ग्राहक पंचायत भद्रावती ने निवेदन देल्याचे सांगितले. यावर तहसीलदार राजेश भांडारकर यांनी तुरंत कारवाई करत तहसील कार्यालय परीसरात कागदी कपात चहाला बंदी घालण्याचे निर्देश दिले.


