वरोरा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
. कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची उजळणी करत, त्यांचे हिंदुत्ववादी विचार आणि जनतेसाठीची तळमळ यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार केला.
. कार्यक्रमात विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक किशोर टिपले, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख गणेश चिडे, उपशहर प्रमुख मनीष दोहतरे, राजू गावंडे, राकेश टापरे, आकाश धानोरकर, अनिल गाडगे आणि सोपान किनाके आदी मान्यवर उपस्थित होते.