वीस ‘दत्तक गावं’ उपक्रमास आर्थिक मदतीतून सुरुवात
चिमूर : नेचर फाउंडेशन च्या वतीने चिमूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांकरिता मोफत अभ्यासिका, पुस्तके व शिकवणी वर्ग चालवण्यात येते. या अभ्यासिकाकरिता आमदार भांगडिया यांनी पुढाकार घेत स्वतःच घर अभ्यासिकेसाठी देत स्पर्धा परीक्षा पुस्तकें व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. यामुळे विद्यार्थ्यांत आनंद व्यक्त होत आहे.
. नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उच्चशैक्षणिक क्रांती करण्याकरिता “दत्तकगावं” या उपक्रमांतर्गत वीस गावे दत्तक घेण्यात आले. नर्सरी पासून ते पदवी पदव्युत्तर शिक्षण घेण्याकरिता मोफत शिक्षणाच्या योजनांच्या माध्यमातून त्यांना प्रवेश करून घेणे व त्यांची व्यवस्था करण्याकरिता प्रत्येक गावामध्ये ‘दिशामित्र’ म्हणून स्वयंसेवक नेमण्यात आले आहे. तर निरीक्षक म्हणून व्यवस्थापकाची निवड करण्यात आली. या संपूर्ण काम करणाऱ्या स्वयंसेवकांना आमदार बंटी भांगडिया यांच्या माध्यमातून दर महिन्याला मानधन दिले जात आहे.
. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा नंतर ही ग्रामीण भागातील दलित, होतकरू, मागास, आदिवासी विद्यार्थी हा उच्च शिक्षणामध्ये अजूनही मागासलेला आहे.याकरिता या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणामध्ये “लोकल टू ग्लोबल”या उपक्रमांतर्गत नेचर फाउंडेशन गेल्या तीन वर्षापासून विदर्भात काम करीत आहे. याकरिता दत्तक गाव,ग्लोबल लिंक,शिक्षण संवर्धन,संविधान जागर,रक्तदान शिबिर,”एक रोपट जन्मदिवसाच” यासारखे विविध उपक्रम या क्षेत्रामध्ये राबवत आहे.