ग्रामसभा सक्षम झाली तरच समस्या सुटतील : रवी मानव 

284

पावना येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव

वरोरा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गावाचा संपूर्ण विकासाला मार्गदर्शक असा ग्रामगीता ग्रंथ लिहिला. गावाच्या सर्व समस्या जर सोडवायचे असतील तर जात धर्म बाजूला सरून गावातील लोकांनी गावाच्या विकासासाठी एक यावे लागेल यानेच ग्रामसभा सक्षम होईल आणि ग्रामसभा सक्षम झाली तरच गावातील सर्व समस्या सुटू शकेल असे प्रतिपादन रवी मानव यांनी पावना येथे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात केले

.     याप्रसंगी बोलताना रवी मानव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनातील अनेक प्रसंग सांगून त्यांची स्मृतींना उजाळा देण्याचे काम केले. या कार्यक्रमांमध्ये मुकेश जीवतोडे, नरेंद्र जीवतोडे, नामदेवराव गव्हाळे, बाळासाहेब पडवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पावना येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन अतिशय उत्साहामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये खंजिरी भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विद्यार्थ्यांकरीता उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

.      गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंतांच्या भजन स्पर्धेचे आयोजन अतिशय कुशलपणे करण्यात आलेले होते. राष्ट्रसंतांचा हा विचार जनमानसात पोहोचवन्याचे कार्य श्रीगुरुदेव सेवा मंडळ करत असल्या बद्दल त्यांचे अभिनंदन रवी मानव यांनी यावेळी केले. पुण्यतिथी उत्सवाचा समारोप गोपाल काल्याने करण्यात आल्या. यावेळी ह भ प शरद महाराज वैद्य यांनी आपल्या सुमधुरवाणीतून काल्याचे कीर्तनाचे सादरीकरण केले. या पुण्यतिथी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण पावना, गुरुदेव सेवा मंडळ यांनी परिश्रम घेतले.