चालक गंभीर
मटन सेंटर वरील कामगार ठार
तळोधी (बा) शिवाजी चौकातील घटना
नागभीड : नागपूर वरून भरधाव वेगात असलेल्या तांदूळ भरलेल्या ट्रकने उभ्या असलेल्या कबाडी ट्रकला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की रोड लगत असलेल्या मटण च्या दुकानावर ट्रक गेल्याने मटण दुकानातील कामगाराचा मृत्यू झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील नागभीड तालुक्यातील तळोधी बा. शिवाजी चौकाजवळ घडली. रामेश्वर चेकचंद ठाकरे असे गंभीर जखमी चालकाचे नाव आहे. तर माधव नामदेव मांढरे (35) राहणार तळोधी (बा) असे मृतक कामगाराचे नाव आहे.
. प्राप्त माहितीनुसार नागपूरवरून तांदूळ भरलेला ट्रक क्रमांक एम. एच. 40 वाय 2990 हा मूल येथे भरधाव वेगाने जात होता. दरम्यान तळोधी (बा) येथे कबाडी चा सामान भरलेला ट्रक क्रमांक एम. एच. 32 Q. 5374 हा उभा होता. त्याला जोरदार धडक दिल्यामुळे तांदूळ भरलेले 250 कट्टे धडकेने अस्ताव्यस्त झाले होते. या जोरदार धडकेमुळे उभे खाली असेलेले ट्रक 50 मीटर पर्यंत मागे सरकले. रोडच्या कडेला किशोर कटारे याच्या मटन सेंटरवर माधव मांढरे काम करीत असताना ट्रकची धडक बसली. आणि ते गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान माधव मांढरे यांचे निधन झाले. याबाबत तांदूळ भरलेल्या ट्रक ड्रायव्हर रामेश्वर टेकचंद ठाकरे वर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
. अधिक तपास तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर, अंमलदार हंसराज सिडाम, राहुल चिमुरकर, स्वप्नील चांदेकर, महिला अंमलदार वैष्णवी लेनगुरे, संगीता कोसनवार,अधिक तपास करीत आहेत.