खडसंगी येथे वं. राष्ट्रसंताच्या ५६ वा पुण्यतिथी महोत्सव

326

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आयोजन 

चिमूर : तालुक्यातील खडसंगी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित केला आहे. यात विविध उपक्रमांनी समाज प्रबोधन होणार आहे.

.      शुक्रवार दि. १७ ला मोहन समर्थ यांचे मार्गदर्शनात सामुदायिक ध्यान, घटस्थापना व पूजन नंतर शारदा भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, बाल संस्कार कॉन्व्हेन्ट चा सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांचा हळदी कुंकू, सिंगरारे यांचे मार्गदर्शनात सामूदयिक प्रार्थना व रात्रौ गुरुदेव सेवा मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.१८ ला सामुदायिक ध्यान, ग्राम दर्शन विद्यालय कडून परिसर स्वच्छता अभियान, नवदुर्गा व अनुसया माता महिला भजन कार्यक्रम, सर्व सताना मौन श्रद्धांजली, राष्ट्रीय प्रबोधकार राज घुमणार याचे मार्गदर्शन, सामुदायिक प्रार्थना व नारीशक्ती महिला भजन मंडळी कडून भजन सध्या होणार आहे. रविवार दि. १९ ला ह.भ.प.गवते महाराज याचे मार्गदर्शनात सामुदायिक ध्यान, गावातून रामधून आणि त्या वर राष्ट्रीय व्याख्याते राज घुमणार यांचे मार्गदर्शन, ह.भ. प.नामदेव गव्हाळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन, प्रमुख उपस्थिती व त्यांचा सत्कार त्या नंतर गोपाळकाला व महाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे.

.      या कार्यक्रम ला परिसरातील सर्व गुरुदेव भक्त यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. गुरुदेव सेवा मंडळ खडसंगी व समस्त ग्रामवासी यांचे कडून करण्यात आले आहे.