मुर्सा येथे शासकीय आधारभुत दराने सी.सी.आय. तर्फे कापूस खरेदीचा शुभारंभ

458

भद्रावती : कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावती अंतर्गत उपबाजार आवार, मुर्सा येथील मे. गौरीनाथ ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मुर्सा येथे गुरूवार दि. 14 ला सी. सी. आय. मार्फत शासकिय आधारभूत दराने बाजार समितीचे सभापती भास्कर ताजणे यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 43 क्वि. कापूस खरेदी करण्यात आला असून रु. 7521 प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्यात आला.

.      याप्रसंगी बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर डुकरे, परमेश्वर ताजणे, राजेंद्र डोंगे, शामदेव कापटे तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह सी. सी. आय. भद्रावतीचे केंद्र प्रमुख निळकंठ अकोटकर व लिपीक ललीता कुमारी तसेच मे. गौरीनाथ ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मुर्सा चे संचालक अशोक हरियाणी, मयुर हरियाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आलेले शेतकरी शैलेश एकोब भडके, मुर्सा व वामन सदाशिव जगताप, भद्रावती यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, प्रविण राहुलगडे, रोहित शेडामे तसेच मापारी गणेश नागोसे यांनी सहकार्य केले.

शेतमाल विक्रीस आणण्याचे आवाहन                                                                                                                                                  चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला कापूस भद्रावती तालुक्यातील उपबाजार आवार, मुर्सा येथील मे. गौरीनाथ ॲग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि., मुर्सा येथे आधार कार्ड, मोबाईल क्र. लिंक केलेला, अद्यावत पिक पेरा असलेला 7/12, बँक पासबुक इ. कागदपत्र तयार करून कापूस नोंदणी करावी. सदर केंद्रावर सी. सी. आय द्वारे शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरूवात झालेली असुन नोंदणी करून विक्रीस आणावे असे संयुक्त आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर ल. ताजणे, उपसभापती अश्लेषा मं. भोयर (जिवतोडे)  सचिव नागेश पुनवटकर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.