पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा केला दावा
चिमूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रात प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेते देखील विविध मतदारसंघात सभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूर जिल्हातील चिमुर विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमदेवार बंटी भांगडिया यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केला. तसेच कलम ३७० बद्दल भाष्य करत जनतेने आशीर्वाद दिल्यामुळे ३७० कलम कायमचं जमिनीत गाडलं, असंही म्हणाले. तसेच महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी आहे, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले महायुतीचे संकल्प प्रत्र म्हणजे विकासाची गती होय, महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्राचा विकास मोठया प्रमाणात झाला . कान्पा – वरोरा, नागपुर – गडचिरोली रेल्वे मार्गाला गती मिळाली, नक्षलवाद कमी झाला , जम्मु – काश्मीर मधिल ३७० कलम रद्द करण्यात आले याउलट कॉग्रेसने भष्टाचारात पीएचडी केली अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जिल्हातील चिमुर विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमदेवार बंटी भांगडिया आणि विदर्भातील महायुतीच्या उमेदवारासाठी चिमुर येथे आयोजीत सभेत व्यक्त केले.
. ते पुढे म्हणाले भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहले परंतु जम्मु काश्मीरसाठी वेगळे संविधान, कलम लागु होते ते हटविण्याची धमक भाजपाने केली . यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचा दावा केला.तसेच कलम ३७० बद्दल भाष्य करत जनतेने आशीर्वाद दिल्यामुळे ३७० कलम कायमचं जमिनीत गाडलं,असंही म्हणाले. तसेच महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी असून कांग्रेसने पिएचडी आहे,अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रात भाजपा व मित्र पक्षाचे सरकार येईल असा विश्वास देशाचे प्रतप्रधान यांनी १२ नोव्हेबर रोज मंगळवारला चिमुर येथील प्रचारसभेत व्यक्त केला.