चंद्रपूर : जिल्ह्यतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत देवई, बोर्डा, जिवती, आणि देवाडा या केंद्राच्या स्पर्धेत एकूण 813 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
. सदर स्पर्धेत थाळीफेक, गोळाफेक, 100 मीटर रिले, 400 मीटर रिले, लांब उडी , उंच उडी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि हँडबॉल अशा विविध खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या खेळांमध्ये जोमाने सहभाग घेतला, आणि त्यांच्या क्रीडा कौशल्यांचा उत्कृष्ट आविष्कार केला. या स्पधेत एकूण 813 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये देवई केंद्रातून 96 मुले आणि 80 मुली, बोर्डा केंद्रातून 107 मुले आणि 128 मुली, जिवती केंद्रातून 94 मुले आणि 89 मुली, तर देवाडा केंद्रातून 121 मुले आणि 98 मुली असे एकूण 418 मुले आणि 395 मुलींचा सहभाग होता. देवाडा केंद्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत, विविध खेळांमध्ये आपले वर्चस्व सिध्द केले. त्यांचे खेळाडू विशेषत: कबड्डी आणि थाळीफेक या खेळांमध्ये चमकले.
. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी देवाडा केंद्राच्या विशेष कामगिरीचा उल्लेख करत ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्रीडा कौशल्ये आणि त्यांचा खेळातील उत्साह पाहून अतिशय अभिमान वाटतो. या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जे प्रदर्शन केले आहे, ते भविष्यातील त्यांच्या यशाचा पाया ठरेल. त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि खेळातील निपुणता हे राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्पर्धामध्येही यशस्वी होण्यासाठी त्यांना मदत करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.